आदर्श विचारांचा संग्रह करणे,' सकारात्मक राहणे, सर्वाना प्रेरणा आणि उत्साह देणे, सकरात्मकतेला प्रोत्साहित करणे हीच विचारधनची संकल्पना आहे. थोडी-थोडकी नव्हे तर चक्क १४ वर्षांपासून नागेबाबाची 'विचारधन' ही चळवळ अखंडपणे सुरू आहे. ज्यामध्ये आपला परिवार देखील विशाल होत आहे. या चळवळीचा मुख्य उद्देश म्हणजे सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांचा प्रसार करणे. आजवर मिळालेल्या असंख्य प्रतिक्रियांच्या संदर्भातून सांगायला आनंद वाटतो की, 'विचारधन'मुळे अनेक आत्महत्या रोखल्या गेल्या आहेत. कित्येकांना नवीन उमेद आणि उत्साह मिळाला आहे. दिवसाची सुरुवात सुंदर विचारांमुळे होत असल्यामुळे आपलं जीवन देखील अधिक सुंदर होत आहे.